By  
on  

नेटफ्लिक्सच्या या आगामी हिंदी सिनेमात झळकणार रिंकू राजगुरु

'सैराट'ची आर्ची म्हणून करियरची सुरुवात करणारी अभिनेत्री रिंकू राजगुरु मराठीसह आता हिंदीतही लोकप्रिय झालीय. विविध हिंदी प्रोजेक्ट्सच्या माध्यमातूनही रिंकू विविध भूमिका साकारताना दिसतेय. नुकतच रिंकूच्या आगामी सिनेमाची घोषणा करण्यात आलीय.

'अनकही कहानिया' या आगामी हिंदी सिनेमात रिंकू झळकणार आहे. या सिनेमात प्रेमाच्या तीन अनोख्या कहाणी पाहायला मिळतील. यातील एका कथेत रिंकू राजगुरु झळकणार आहे. अश्विनी तिवारी, अभिषेक चौबे, साकेत चौधरी यांनी या सिनेमातील कथांसाठी दिग्दर्शन केलय. अभिनेता अभिषेक बॅनर्जी, झोया हुसेन, कुणाल कपूर, पालोमी, देलझाद हिवले हे कलाकार या सिनेमात झळकतील. रिंकूने सोशल मिडीयावर या सिनेमाची पोस्ट करत याविषयी माहिती शेयर केलीय. रिंकू या पोस्टमध्ये लिहीते की, "ह्या मोठ्या शहरात प्रेम मिळणं सोपी गोष्ट नाही. अश्याच प्रेमाची अनकही कहानिया लवकरच नेटफ्लिक्सवर 17 सप्टेंबरला येत आहे."

कन्नड कहाणीवर आधारीत जयंत कैकीनी यांच्या 'मध्यांतर' या कथेत रिंकू राजगुरु ही देलझादसोबत झळकणार आहे. 17 सप्टेंबर रोजी हा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल.

आत्तापर्यंत रिंकूने वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. मात्र या सिनेमाच्या निमित्ताने रिंकू पुन्हा एकदा एका प्रेमकथेवर आधारित सिनेमात झळकतेय. याआधी रिंकू ही 'हँड्रेड' या हिंदी वेबसिरीजमध्ये झळकली होती. शिवाय 'अनपॉझ्ड' या हिंदी सिनेमातही झळकली होती. '200 हल्ला हो' या हिंदी सिनेमातही ती महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. तेव्हा मराठीसह हिंदीतही रिंकू राजुगुरु उंचच उंच झेप घेताना दिसतेय. आगामी काळात 'आठवा रंग प्रेमाचा', 'छूमंतर' या मराठी सिनेमांमध्ये रिंकू झळकणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive