By  
on  

Photos : चिखलद-यातील निसर्गसानिध्याचा आनंद लुटतेय अभिनेत्री पूजा सावंत

सततचं शूटींग,कामाची धावपळ, नवनवीन प्रोजेक्टसच्या तारखा जुळवणं अशा सर्व बिझी शेड्यूलमधून स्वत:साठी वेळ काढणं तसं सेलिब्रिटींसाठी थोडं मुश्किल असतंच. त्यात लॉकडाऊननंतर पुनश्च हरिओम झाल्याने पुन्हा जोमाने कामाला लागणं हे आलंच. पण या सर्वात एक छोटा ब्रेक तर बनतोच. म्हणूनच मराठी सिनेसृष्टीतील सुंदर आणि आघाडीची अभिनेत्री पूजा सावंत महाराष्ट्रातील निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आस्वाद घेतेय.

 

 

छोट्या ब्रेकसाठी पूजाने महाराष्ट्रातील निसर्ग सौंदर्याने नटलेल्या चिखलदरा हिल स्टेशनची निवड केलीय. 

 

अमरावती जिल्ह्यातील  चिखलदरा हे सातपुडा पर्वतरांगेतील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे.

 विदर्भाचं काश्मीर म्हणून चिखलदऱ्याची ओळख आहे. पावसाळा सुरु झाला की, पर्यटकांचं पाऊल हमखास चिखलदऱ्याकडे वळतंं.

दऱ्या-खोऱ्यात वसलेलं मेळघाट आता हिरवंगार झाले आहे. त्यामुळे सकाळच्या वेळी असलेलं धुकं आणि आल्हाददायक वातावरणाचा आस्वाद पूजाने घेतला

पूजा निसर्गसानिध्यात एकदम रिफ्रेश झाली. 

 

पूजाच्या या चिखलदरा ट्रीपवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive