By  
on  

सई ताम्हणकर- ललित प्रभाकर घेऊन येत आहेत ‘पेट पुराण’

सई ताम्हणकर आणि ललित प्रभाकर ही जोडी पुन्हा एकदा पडद्यावर येण्यास सिद्ध झाली आहे. सई ताम्हणकर आणि ललित प्रभाकर आगामी 'पेट पुराण' या सिनेमात झळकणार आहेत. सई ताम्हणकरने नुकताच सोशल मीडियावरुन याबद्दलचा खुलासा केला आहे. तसेच शुटींगला सुरुवात झाल्याचंदेखील म्हटलं आहे. 

 

या जोडीचा हा हॅटट्रिक सिनेमा आहे. या सिनेमाशिवाय हे दोघंही ‘मिडियम स्पायसी’ आणि कलरफुल या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आता या हटके सिनेमात या दोघांना पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतील यात शंका नाही.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive