By  
on  

अभिनेता भुषण प्रधानकडे आहेत एक –दोन नाही तर जवळपास 180 रोपं

अभिनय आणि जिमिंगची आवड असलेला अभिनेता भुषण प्रधान सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असतो. भुषण सध्या आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आहे. भुषणकडे जवळपास 180 रोपटी आहेत. निसर्गाच्या सानिध्यात रमायला आवडत असलेल्या भुषणने घरात 180 रोपटी जपली आहेत. वाढवली आहेत. भुषण आपल्या बिझी शेड्युलमधूनही वेळ काढताना दिसतो.

 

 

गेल्या काही वर्षात त्याने घरात या रोपांना उत्तम सांभाळलं आहे. याबाबत भुषण म्हणतो, ‘ जेव्हा एखादं रोप कोमेजताना किंवा वाढ खुरटलेली दिसते तेव्हा खरंच सांगतो खुप वाईट वाटतं. रोपांचं पालकत्व स्विकारणं सोपं नाही. त्यासाठी संयम आणि कोमलता पाहिजे.’ भुषण सध्या ‘जय भवानी जया शिवाजी’ मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसतो आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive