करोनाच्या निर्बंधांमध्ये काही अंशी शिथिलता आली आहे. पण मॉल उघडले असले तरी महाराष्ट्रात थिएटर आणि नाट्यगृह मात्र अजून सुरु झालेले नाहीत. मागील वर्षापासून नाट्यकर्मी पुन्हा जोमाने मनोरंजन क्षेत्र सुरु होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनेही याबाबत पोस्ट शेअर केली आहे.
सोनाली आपल्या पोस्टमध्ये म्हणते, ‘जिम..
शूटिंग..
लग्न समारंभ..
ट्रेन..
खेळ.. सगळंच उघडलंय..
मॅाल सुध्दा..
सिनेमांना OTT चा पर्याय मिळालाय..
नाटकाचा पडदा उघडण्यासाठी अजून किती प्रतिक्षा.. दोन्ही लस झालेले कलाकार, तंत्रज्ञ आणि मर्यादित प्रेक्षकसंख्या चालणार नाही का’ सोनालीच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनीही नाट्यगृहांबाबत काळजी व्यक्त केली आहे.