हेडलाईन वाचून तुम्ही नक्कीच चक्रावले असणार यात शंका नाही. बेबी बंपसह कोण उड्या मारतं असं तुम्हाला नक्कीच वाटलं असणार. गरोदरपणात योगा, हटके फोटोशूट यांचा ट्रेंड आहेच, पण उड्या म्हटलं तर जरा धडकीच भरते. पण एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा गरोदरपणात चक्क उड्या मारत डान्स करतानाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत या अभिनेत्रीचं बेबीबंप दिसत आहेत. तसचं ती हॉस्पिट गाऊनमध्येही दिसतेय.
या व्हिडीओत आधी ही अभिनेत्री पोटावर आणि कमरेवर हात ठेवत त्रासलेल्या अवस्थेत चालत येताना दिसतेय आणि अचानकच ती उड्या मारत नाचू लागते. या अभिनेत्रीने मास्कदेखील घातलं आहे. हे दृश्य पाहून कुणालाही आश्चर्याचा धक्का बसेल. मात्र या व्हिडीओत दिसणारी ही अभिनेत्री आहे प्रिया बापट. सिटी ऑफ ड्रीम्स सीझन २ च्या सेटवर प्रिया ही तिच्या पूर्णिमा गायकवाड या व्यक्तिरेखेत ही धम्माल करताना दिसतेय.
काही फोटो आणि एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंसोबतच प्रियाने हा धमाल व्हिडीओ शेअर केलाय.
‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेब सीरिजमध्ये प्रिया बापटने पौर्णिमा गायकवाड ही भूमिका साकारली आहे. प्रियाने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये पडद्यामागील काही खास क्षण चाह्त्यांसोबत शेअर केले आहेत. यात सहकलाकार आणि टीमसोबतचे काही फोटो तिने शेअर केले आहेत.