आज सगळीकडे रक्षाबंधनाचा खास माहोल आहे. भावा-बहिणीचं अतुट आणि आबंटगोड नातं साजरं करण्यासाठी यापेक्षा वेगळा क्षण असूच शकत नाही. ‘आई कुठे काय करते’ मालिकेत यशच्या भूमिकेत दिसणारा अभिषेक यानेही बहिणीसोबतचा खास आणि मजेदार आठवणी शेअर केल्या आहेत.
अमृता सोबतचा एक धमाल किस्सा शेअर करु शकतोस का?
या रक्षाबंधनासाठी मी आणि अमृता एकत्र नाही आहोत. पण मी तिच्यासाठी खास गिफ्त घेतलं आहे. लहानपणी मात्र मी तिला गिफ्ट देण्याच्या बहाण्याने खुप सतावलं आहे. तिला मी लहानपणी रक्षाबंधनाला खुप मोठ्या बॉक्समध्ये पाच रुपयाचं कॉईन दिलं आहे. यावेळी तिची चिड चिड व्हायची ते पाहून मजा यायची. पण गेले दोन वर्षं आम्ही कामानिमित्त वेगवेगळ्या शहरात आहोत. त्यामुळे रक्षाबंधन नीटसं साजरं करु शकलो नाहीये. पण यावर्षी नक्कीच मोठ आणि छान गिफ्ट द्यायचं मी ठरवलं आहे.
ऑनस्क्रीन बहीण ईशासोबतच बाँडिंग कसं आहे?
सेटवर मी ईशा आणि अभि अगदी भावा-बहिणींप्रमाणेच राहतो. धमाल मस्ती सुरु असते कायमच. आमचं सिल्व्हासाला असतानाही खुप धमाल केली. इशाला मला गिफ्ट द्यायचं झालंच तर किमान पन्नास एक पिज्जाचे कुपन देईन. कारण तिला पिझ्झा खुप आवडतो. सो हे गिफ्ट तिला नक्कीच आवडेल.
अमृताला रक्षाबंधन निमित्त नेहमीपेक्षा हटके असं काय गिफ्ट द्यायला आवडेल
अमृताला हटके गिफ्ट द्यायचं झालं तर मी थर्मामीटर देईन. कारण मी तिला चिडवतो, मस्ती करतो. मग ती खुप चिडते. त्यावेळी थर्मामीटरचा वापर करुन मी तिला सांगेन की, तिचा पारा किती चढला आहे ते.
मालिकेतील असा moment किंवा सीन जो तुला खूप आवडतो
मालिकेतील सगळेच सीन चांगले वाटतात. त्यामुळे काम करताना कायमच मजा येते. पण काही सीन माझ्या खास जवळचे आहेत. त्यापैकी एक म्हणजे आईला मी अंगाई गाऊन झोपवतो तो सीन. आई त्रासामुळे वैतागलेली असते. तिला आरामाची गरज असते. त्यावेळी मी तिला अंगाई गीत गाऊन झोपवतो. हा अलीकडेच मला आवडलेला सीन आहे. याशिवाय साखरपुड्याच्या वेळी सगळे आजीला मनवतात आणि गौरी आणि यशचा साखरपुडा पार पडतो. हा सीन देखील माझा लाडका आहे.