'देवमाणूस' मालिका आणि या मालिकेतील प्रत्येक पात्राने रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. ही मालिका महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचली. देवमाणूस साकारणारा अभिनेता किरण गायवाडसुध्दा या मालिकेतील मुख्य भूमिकेमुळे प्रचंड लोकप्रिय ठरला. नुकत्याच झालेल्या महाएपिसोडमध्ये या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. दहा जणांचे खून करणारा देवी सिंग उर्फ अजित कुमार देवचा चंदा खून करते आणि हे डिंपल बघते व डिंपल चंदाचा खून करते, असं दाखविण्यात आलं असलं तरी शेवटी मात्र हॉस्पिटलमध्ये पुन्हा जिंवत झालेला देवी सिंग पाहून देवमाणूसचा सिक्वल येणार अशी शक्यता नाकारता येऊ शकत नाही.
डॉ. अजितकुमार देव उर्फ देवीसिंग याची भूमिका अभिनेता किरण गायकवाडने योग्य न्याय देत प्रेक्षकांची मोठी पसंती मिळवली आहे.मालिका संपल्यानंतर देवसिंग म्हणजेत अभिनेता किरण गायकवाडने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही खास फोटो शेअर केले आहेत. याचसोबत किरणने प्रेक्षकांसह टीमचे आभार मानत एक खास पोस्ट शेअर केलीय.
किरण लिहतो, मी खुप दिवस झाले हा विचार करतोय कि post लिहावी पण शब्द नव्हते … आज लिहुनच टाकल..देवमाणूस सीरियल बघता बघता संपली …..
तो पुढे लिहतो, "खरतर कुठलाही प्रोजेक्ट तेव्हाच चांगला होतो जेव्हा सगळे जीव तोडुन काम करत असतात माझे सहकलाकार , सर्व तंत्रज्ञ, प्रॉडक्शन टीम, हेअर आणि मेकअप डिपार्टमेंट ते स्पॉट दादां पर्यंत साऱ्यांनी हातभार लावला ….
देवमाणुस च्या सेटवरचा प्रतेक माणुस जीव तोडून काम करत होता त्याबदल वादच नाही ; कारण रात्री साडे दहा वाजता परदर्शित होणाऱ्या आजवरचया मालीकांचे टीआरपी रेकॉर्डस देवमाणसू ने मोडले. टीआरपीचे रेकॉर्डस नक्कीच आनंद देतात पण त्यापेक्षाही घराघरातले छोटे नी मोठे रात्री जागनू न चुकता देवमाणुस बघु लागले
“या डॉक्टर ला लई हानला पाहेन “
“हयों कसला डॉक्टर शैतान हाय ह्यो “
“हा डॉक्टर ह्यच्यातर @&₹£^%# (अपशब्द)“
“खुप सारे meme तयार झाले memers ला पण सलाम यार “
आणि मी म्हणतो हीच खरी माझ्या कमाची पावती
हा प्रवास खरंच सोपा नव्हता. इतक्या गंभीर विषयाला अत्यंत सोप्या आणि मनोरंजक पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडताना मनात साशंकता नक्कीच होती..पण जशी कागदावर गोष्ट आणण पात्र आकार घेऊ लागली तशा या शंका मनातुन दूर झाल्या. पद्मा मँडम @padmashinde व मालिकेचे लेखक स्वप्निल सर @swapnilvilas आणि विशाल कदमने @vishal_writer कागदावर ही पात्रं जीवंत केली …. सलाम तुमच्या लेखनीला आणि असे अनेक पात्र तुमच्या लेखनीतुन जन्म घेत राहो