By  
on  

प्रसिध्द अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना कॅन्सरचं निदान; मुंबईतील रुग्णालयात झाली शस्त्रक्रिया

मराठी-हिंदी सिनेसृष्टी गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते- दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. महेश मांजरेकर यांना मूत्राशयाच्या कर्करोगाचे निदान झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळेच उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. महेश मांजरेकर यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली आहे.

मुंबईतील एच एन रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली. महेश मांजरेकर यांची प्रकृती आता ठिक आहे.

 

संजय दत्तच्या ‘वास्तव’ या लोकप्रिय ठरलेल्या सिनेमातून महेश मांजरेकर यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. दिग्दर्शन आणि लेखनासोबतच महेश मांजरेकर यांना अभिनेता म्हणून चाहत्यांनी मोठी पसंती दिली. खासकरून सलमान खानच्या ‘वांटेड’, ‘दबंग’, ‘बॉडीगार्ड’ अशा अनेक सिनेमांमधून महेश मांजरेकर यांनी विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.

मराठीतसुध्दा महेश मांजरेकर यांनी काकस्पर्श, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, दे धक्का , नटसम्राट असे दर्जेदार सिनेमे दिले आहेत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive