नुकतंच रक्षाबंधन पार पडलं. यावेळी अनेक सेलिब्रिटींनी भावंडासोबत हा दिवस साजरा केला. रक्षाबंधना दिवशी भावाला राखी बांधून त्याने बहिणीचं रक्षण करावं असा संकेत आहे. काही अभिनेत्रींनी परंपरेचा नवा आयाम चाहत्यांसमोर आणला आहे. भार्गवी चिरमुले आणि चैत्राली गुप्ते या बहिणींनी एकमेकींना राखी बांधत रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
तर अभिनेत्री मोनालिसा बागलनेही बहीण अश्विनी बागलला राखी बांधत रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘Didi, नेहमी माझ्यासोबत राहा, माझं रक्षण करत राहा आणि अजून अजून जास्त प्रेम करत राहा... I love you!’ हे कॅप्शन देत मोनालिसाने बहिणीसोबत फोटो शेअर केला आहे. तर खुशबु आणि तितीक्षा तावडे या बहिणींनीही एकमेकींसोबतं बाँडिंग शेअर करत रक्षाबंधनच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
तर मृणाल देशपांडे आणि समिधा गुरु या बहिणींनीही एकमेकींना राखी बांधत हा सण साजरा केला आहे.