By  
on  

हेमांगी कवी म्हणते, ‘मला लोक विचारतात तुझ्या घरचे तुझी पोस्ट वाचत नाहीत का?’

अभिनेत्री हेमांगी कवी सोशल मिडियावर अनेक बाबींसंदर्भात पोस्ट करत असते. तिच्या पोस्टचं कधी कौतुक होतं तर कधी हेमांगीच्या पोस्टवर सडकून टिकाही होत असते. हेमांगीने पहिल्यांदाच तिच्या घरच्यांच्या रिअ‍ॅक्शनबाबत चाहत्यांशी शेअर केलं आहे. हेमांगीने रक्षाबंधनच्या पोस्टच्या निमित्ताने ही बाब शेअर केली आहे.

 

 

ती आपल्या पोस्टमध्ये म्हणते, मी social media वर जे काही लिहिते, व्यक्त होते किंवा कुठले ही photos, videos share करते त्यावर लोकांची हमखास एक reaction असते.... तुझे घरचे social media वर नाहीयेत का? घरचे म्हणजे खासकरून घरातली पुरुष मंडळी... बाबा आणि भाऊ! हो आहेत की! बाबा होते पण ते आता नाहीयेत पण माझा भाऊ आहे social media वर आणि तो बघतो, वाचतो माझ्या सगळ्या posts! त्यावर दादाची एकच reaction असते... Good or Bad मी आहे तुझ्यासोबत! तुझं रक्षण करायला! लहानपणी राखी पौर्णिमेच्या दिवशी औक्षण करून एक धागा बांधायचा आणि मोबदल्यात जे काही मिळायचं/ मिळवायचं gift, पैसे पासून 'मी आहे तुझ्यासोबत' हे gift आणि पैशा पलीकडे गेलेलं नातं खूप भारी आहे आणि म्हणूनच मी नाही घाबरत! ’

Author

Recommended

PeepingMoon Exclusive