By  
on  

बोलीभाषेतील विविध शब्दावरील या अभिनेत्रींचा व्हिडियो होतो आहे व्हायरल

मराठी भाषा अनेक बोलीभाषांनी समृद्ध आहे. या बोलीभाषेत अनेक शब्द आहेत ते बरेच जणांना माहितीही नसतात. पण या अभिनेत्रींनी मात्र हे शब्द चांगलेच ट्रेंड मध्ये आणले आहेत.  भार्गवी चिरमुले, मृणाल देशपांडे, सई रानडे आणि समिधा गुरु यांनी एक धमाल व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये मराठी शब्दाला इतर बोलीभाषेतील शब्द त्या सांगताना दिसत आहेत.

 

 

समिधा गुरुने हा व्हिडियो शेअर केला आहे. आपल्या पोस्टमध्ये ती म्हणते, ‘#माहोलमुली
आपल्या समृद्ध मराठी भाषेतील वेगवेगळे शब्द आणि लहेजा

1) अरे - अबे
२) वायफळ गप्पा-लप्पास्या
३) चतुर - चतरी
४) अव्यवस्थित - हेंदडी

शब्दशोध मदत - @abhijit_guru
दिग्दर्शन - @abhijeetkhandkekar
छायांकन - @salilsane
पडद्यामागचे छायाचित्रण - @durvaguru
ता.क.- ह्या सगळ्यांना जबरदस्ती कामाला लावण्यात आले आहे . यापुर्वीही या चौघींचा व-हाडी भाषेतील शब्दांचा व्हिडियो व्हायरल झाला होता. त्यालाही प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive