सैराटची आर्ची म्हणून रिंकू राजगुरु महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या कानाकोप-यात पोहचली. आपल्या पदार्पणातील व्यक्तिरेखेसाठी रिंकूने राष्ट्रीय पुरस्कार पटकावला.
सैराटनंतर अभिनेत्री रिंकू राजगुरु सुसाट सुटली. सैराटची आर्ची ही ओळख कधीच मागे सोडत रिंकू सध्या अनेक मराठी सिनेमे, हिंदी वेबसिरीज यांमधून रसिकांच्या भेटीला येतेय. आता ती अनेक आव्हानात्मक भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येतेय.
अशाच जातीव्यवस्थेवर भाष्य करणा-या एक्शन-थ्रीलर 200-हल्ला हो या हिंदी सिनेमामध्ये रिंकू राजगुरु एका दमदार भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आली.
चित्रपटात रिंकू राजगुरुने 200 दलित महिलांना त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी एकत्र आणल्याचे दाखवण्यात आले आहे.
हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे.
'200 हल्ला हो'च्या सेटवरचे काही फोटो रिंकूने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या सिनेमात रिंकूसोबतच ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर, बरूण सोबती, उपेंद्र लिमये, सुषमा देशपांडे आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.