मराठी मालिका आणि सिनेमांमध्ये झळकणारी मराठी अभिनेत्री दिपश्री माळी हिच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. काही दिवसांपूर्वीच तिने आपल्या डोहालजेवणाचे सुंदर फोटो शेअर केले होते. सोशल मिडीयावर ही गोड बातमी देताना दिपश्री म्हणते, एक नवीन स्पर्श, नवीन साथ कायमची, एक विश्वास निरंतर राहणारा, एक प्रवास एकत्रीत..........नवीन विश्व...नवीन आयुष्य, आतून बाहेरून बदलुन टाकणारं......
आणि..... शेवटपर्यंत हक्काने सतत कानावर ऐकू येणारा..... निशब्द करणारा एकच शब्द
" आई ".
काल आमच्या घरी लक्ष्मी आली..... मुलगी झाली हो.........
दिपश्रीने गर्ल्स हॉस्टेल, एक घर मंतरलेलं अश्या काही मालिका आणि अनेक मराठी नाटकांत तिने काम केले आहे.