आपल्या सुरांची सुरेल बरसात करणं यात आशाताईंचा हातखंडा. गेली कित्येक वर्ष त्या आपल्या सुमधूर स्वरांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतायत. पण दिग्गज गायिका आशाताई या गायिका असण्यासोबतच खुप मोठ्या खवय्या आणि सुगरणही आहेत, हेसुध्दा तुम्हाला माहित असेलच. युकेमधील एक भारतीय रेस्टॉरंट आहे या रेस्टॉरंटचे नाव ‘आशा बर्मिंगहॅम’ असून हे गायिका आशा भोसले यांचे आहे. जगभरातील अनेक खवय्ये या रेस्टॉरंटला भेटी देतात.
हॉलिवूड आभिनेता टॉम क्रुझला चिकन टिक्का मसाला हा भारतीय पदार्थ प्रचंड प्रमाणात आवडतो. त्यामुळे टॉमलाृ या युकेतील या भारतीय रेस्टॉरंटबाहेर स्पॉट करण्यात आलं.
आशा भोसले यांना ही बातमी कळताच त्यांनी इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे. या फोटो खाली त्यांनी कॅप्शन दिलं, “माल खूप आनंद झाला की टॉम क्रुझने आशा बर्मिंगहॅम या रेस्टॉरंटमध्ये जेवणाचा आस्वाद घेतला.”
या रेस्टॉरंने देखील टॉम क्रुझचा हा फोटो शेअर केला आणि टॉमने चिकन टिक्का मसाला या भारतीय पदार्थाचा आस्वाद घेतल्याचं सांगितलं. हा पदार्थ त्याला एवढा आवडला की त्याने एक नाही तर दोनदा हा पदार्थ मागवला.
आशा भोसले यांनी टॉम क्रुझला पुन्हा आमंत्रण देतं केलेली ही पोस्ट सोशाल मीडियावर व्हयरल झाली आहे.