By  
on  

'रावरंभा' या ऐतिहासिक सिनेमात दिसणार अभिनेत्री मोनालिसा बागल!

II श्री क्षेत्र रायरेश्वर II... तमाम महाराष्ट्रातील जनतेच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनातील पवित्र,पांडवकालीन जागृत देवस्थान... भोर तालुक्यातील,आणि पुणे जिल्ह्यात असलेले,आपल्या साताऱ्यातील वाई पासून जवळच किल्ले रायरेश्वराचे स्थान. याच किल्ले रायरेश्वरावर शंभू महादेवाच्या साक्षीने, बाल शिवाजींनी आपल्या १२ सवंगड्यांसह स्वराज्य स्थापनेची शपथ २६ एप्रिल १६४५ रोजी घेतली.

हे सांगण्याचे विशेष कारण म्हणजे आगामी मराठी सिनेमा "रावरंभा"... आपल्या ऐतिहासिक शाहूनगरीतील पहिला ऐतिहासिक सिनेमा. पटकथा संवाद लेखन श्री प्रताप दादा गंगावणे यांचे असून,  दिग्दर्शक अनुपजी जगदाळे हे दिग्दर्शकाची भूमिका पार पाडणार आहेत. सातारा शहरातील आणि भारतातील प्रसिद्ध टॉप गियर ट्रान्समिशन प्रा. ली. चे संचालक श्री शशिकांत शिला भाऊसाहेब पवार हे ,शशिकांत पवार प्रोडकशन्स या निर्मिती संस्था द्वारे या क्षेत्रात पदार्पण करत आहेत.

या सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले तेव्हापासून या सिनेमा विषयी अनेकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. आता या सिनेमाची उत्सुकता आणखी वाढणार कारण यातील एका प्रमुख कलाकाराची ओळख प्रेक्षकांसोबत होणार. तर प्रेक्षकांसाठी सरप्राइज म्हणजे या सिनेमात अभिनेत्री मोनालिसा बागल प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

नुकतंच या बहुचर्चित ,महत्वकांक्षी, सिनेमाचा स्क्रिप्ट पूजन सोहळा,शंभू महादेवाच्या साक्षीने,आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेल्या पावन भूमीत संपन्न झाला. या प्रसंगी श्री प्रताप दादा गंगावणे, अनुपजी जगदाळे,अभिनेत्री मोनालिसा बागल, 'थोर इतिहासकार भोर'चे श्री दत्ताजी जगदाळे साहेब,उद्योजक मंगेश दादा जाधव,अभिनेत्री अश्विनी बागल , 'धर्मवीर युवा मंच'चे अध्यक्ष प्रशांत नलावडे,निर्माते शशिकांत शिला भाऊसाहेब पवार यांचे सह संपूर्ण टीम उपस्थित होती.

चित्रपटात नामवंत कलाकार असून,त्यांची नावे अद्याप गुलदस्त्यात आहेत. लवकरच या चित्रपटाचे चित्रीकरण चालू होत आहे. तमाम रसिक मायबाप,मित्र,आप्तेष्ट,यांचे आशीर्वाद घेऊन लवकरच 'रावरंभा' आपल्या भेटीला येत आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive