दिग्गज मराठी अभिनेते विजय चव्हाण यांचा आज स्मृतीदिन. आज त्यांच्या अनेक आठवणींना सोशल मिडियाच्या माध्यमातून उजाळा दिला जात आहे. विजय चव्हाण यांनी साकारलेलं अजरामर पात्र म्हणजे मोरुची मावशी. मोरुची मावशी विजय यांच्यानंतर भरत जाधव यांनी हे पात्र साकारलं आहे. या दरम्यानची आठवण भरत जाधव यांनी शेअर केली आहे.
मोरूची मावशीसाठी स्वतः विजू मामांनी मला काही दिवस तालीम दिली होती. तालमी दरम्यान ते गमतीने म्हणायचे की "माझी मावशी दिसायला च्यापटर होती पण आतून भोळी होती, ही नवी मावशी दिसायला भोळी आहे पण आतून च्यापटर आहे..!" या पोस्टवर अभिनेता स्वप्नील जोशीनेही कमेंट करत कौतुक केलं आहे.