By  
on  

अभिनेता संतोष जुवेकरचं सोशल मिडिया अकाउंट हॅक, चाहत्यांना केली ही विनंती

सोशल मिडियावर अकाउंट हॅक होणं काही नवीन बाब नाही. पण अनेक सेलिब्रिटींना मात्र हॅकिंगचा जबरदस्त फटका बसताना दिसतो आहे. अभिनेता संतोष जुवेकरलाही हॅकिंगचा फटका बसला आहे. त्याने इन्स्टाग्राम अकाउंटवरुन ही पोस्ट शेअर करत त्याने माहिती दिली आहे. तो आपल्या पोस्टमध्ये तो म्हणतो, ‘Hello मित्रानो मी पर्वा post केली होती की माझं facebook official page hack झालंय आणि बहुतेक insta सुद्धा.

 

 

ते solve झालं असं मला वाटलं होत पण ते झालं नाहीये. माझ्या page वरून काहीही वाह्यात post आणि stories post होतायत plz ignore and dont respond or dont click on any links plz. मी आता cyber complaint केली आहे. Plz support धन्यवाद. ’ संतोष ‘कधी तू असतेस’ या रोमॅंटिक गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive