सेलिब्रिटी अनेकदा सामजिक कारणांसाठी आपल्या जवळील वस्तूंचा लिलाव करताना दिसतात. आता अभिनेत्री सई लोकूरनेही हेच पाऊल उचललं आहे. सई लोकूरनं कपड्यांची विक्री करण्यासाठी सोशल मिडियावर पेज सुरू केलं आहे. या पेजवर यासंदर्भात माहिती देण्यात येते. कपडे विक्रीतून आलेली रक्कम अनाथाश्रमाला दिली जाणार असल्याचं समोर येत आहे.
मागील वर्षी सई- तीर्थदीप रॉयसह लग्नाच्या बेडीत अडकली. याशिवाय ती महिन्यांपूर्वी 'सनम हॉटलाइन' या वेब सीरिजमध्येही दिसली होती.