By  
on  

झोकात पार पडली अभिनेत्री अभिज्ञा भावेची मंगळागौर, पाहा व्हिडियो

अभिनेत्री अभिज्ञा भावे यंदा तिची पहिली मंगळागौर साजरी करते आहे. यादरम्यान मंगळागौर खेळतानाचे व्हिडियोही तिने सोशल मिडियावर शेअर केले आहेत. या व्हिडियोमध्ये अभिज्ञा आणि तिच्या खास मैत्रिणी अनुजा साठे आणि रेश्मा शिंदेही दिसत आहेत. तिच्या या व्हिडियोवर मयुरी देशमुख आणि रेश्मा शिंदेनेही कमेंट केली आहे. 

 

 

यावर्षी मेहुल पै याच्यासोबत अभिज्ञा विवाहबंधनात अडकली. अभिज्ञाचा पती मेहुल पै हा मुंबईत वास्तव्यास असून एका कंपनीत ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. यातून इव्हेंट मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट, फायनान्शियल प्लॅनिंगचा भार तो सांभाळत आहे. अभिज्ञाही आगामी ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. 
.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive