आई कुठे काय करते मालिकेत संजनाने ज्यासाठी अट्टाहास केला होता अखेर तो क्षण आला आहे. संजाने अनिरुद्धसोबत लग्नासाठी पुर्ण तयारी केली आहे. संजना या लग्नासाठी खुपच उत्साहात आहे. मालिकेत संजनाच्या लूकची नेहमीच चर्चा राहिली आहे. संजनाचं स्टाइल स्टेटमेण्ट तिच्या चाहत्या फॉलो करताना दिसतात.
संजनाची भूमिका साकारणाऱ्या रुपाली भोसलेला देखिल फॅशनचे नवनवे ट्रेण्ड ट्राय करायला खूप आवडतं. त्यामुळे अनिरुद्धसोबतच्या लग्नासाठी तिने खास तयारी केलीय. गुलाबी रंगाच्या साडीत तिचं सौंदर्य आणखीनच खुलून आलं आहे. अनिरुद्धच्या नावाची मेहेंदीही तिच्या हातावर सजली आहे. आता या दोघांचं लग्न पार पडणार की इथेही नवा ट्विस्ट येणार हे मालिकेच्या पुढील भागांमधून कळेल