प्रसिद्ध नाटक आणि पुस्तक ‘देवबाभळी’ साठी दिग्दर्शक, लेखक प्राजक्त देशमुख यांना साहित्य अकादमी युवा पुरस्काराचे २०२० मिळाला आहे. हा पुरस्कार दरवर्षी जाहीर करण्यात येतो. वय वर्षं 35 च्या आतील लेखकांना त्यांच्या पुस्तकासाठी प्रदान करण्यात येतो. ताम्रपत्र तसंच ५०,००० रुपये असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. २०२० चा हा पुरस्कार प्राजक्त देशमुख यांना मिळाला आहे.प्राजक्त यांचं संगीत देवबाभळी हे नाटकही लोकप्रिय ठरलं आहे
मराठीसोबतच बंगाली साहित्यासाठीचे पुरस्कारही जाहीर करण्यात आले.या पुरस्कारांच्या त्रिसदस्यीय समितीमध्ये ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचाही समावेश आहे. प्राजक्त यांच्या देवबाभळी या पुस्तकाला आत्तापर्यंत ३९ पुरस्कारांनी सन्मानित कऱण्यात आलं आहे.