By  
on  

‘देवमाणूस’ किरण गायकवाडचे नव्या प्रोजेक्टचे संकेत ?

अलीकडेच देवमाणूस मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. दहा जणांचे खून करणारा देवी सिंग उर्फ अजित कुमार देवचा चंदा खून करते आणि हे डिंपल बघते व डिंपल चंदाचा खून करते, असं दाखविण्यात आलं असलं तरी शेवटी मात्र हॉस्पिटलमध्ये पुन्हा जिंवत झालेला देवी सिंग पाहून देवमाणूसचा सिक्वल येणार अशी शक्यता नाकारता येऊ शकत नाही.  

 

पण चर्चेदरम्यानच आणखी एक बाब समोर आली आहे. अभिनेता किरण गायकवाड नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. एक मोठा डोंगर दिसत आहे आणि डोंगराच्या पायथ्याशी तो पाठमोरा उभा आहे. विशेष म्हणजे किरण यात फौजीच्या गेट अपमध्ये दिसतो आहे.  यामध्ये त्याचे तोंड दिसत नाही मात्र त्यांनी फोटोला कॅप्शन देताना सांगितले आहे की, समथिंग न्यू अगेन. चाहत्यांना किरणच्या आगामी प्रोजेक्टची उत्सुकता असेल यात शंका नाही.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive