By  
on  

हा सिनेमा केल्याप्रकरणी श्रेयस तळपदे आजही स्वत: मानतो सुदैवी

2005 मध्ये रिलीज झालेल्या ‘इक्बाल’ सिनेमाने प्रेक्षकांची वाहवा मिळवली. श्रेयस तळपदेने या सिनेमात मुकबधिर मुलाची भूमिका साकारली होती. एका मूकबधिर मुलानं आपलं खेळाडू होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी केलेला संघर्ष या सिनेमात चितारला होता. या सिनेमात श्रेयस तळपदेसह नसिरुद्दीन शाह, श्वेता प्रसाद, प्रतिक्षा लोणकर, यतिन कार्येकर हे कलाकारही होते. या सिनेमाने 16 वर्षं पुर्ण केली आहेत.

 

 

श्रेयसने याबाबतची पोस्ट शेअर केली आहे. तो आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, ‘ हा सिनेमा रिलीज होऊन 16 वर्षं झाली आहेत. पण आजही या सिनेमाचं यश मी रोज अनुभवतो आहे, साजरं करतो आहे. हा सिनेमा कुणाचीतरी प्रेरणा बनल्याचं ऐकतो तेव्हा या सिनेमाचा हिस्सा असल्याबाबत स्वत:ला सुदैवी समजतो.’ राष्ट्रीय पुरस्कार विजेता हा सिनेमा नागेश कुकनुर यांनी दिग्दर्शित केला होता. श्रेयस सध्या ‘तुझी माझी रेशीमगाठ’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive