By  
on  

प्राजक्त देशमुख म्हणतो, ‘दोन वर्षांनी नाटकवाल्यांच्या चेह-यावर हसू उमटलं पण......’

नुकतंच साहित्य अकादमी युवा पुरस्कार २०२० ची घोषणा झाली. यंदाचा पुरस्कार दिग्दर्शक, लेखक प्राजक्त देशमुख यांना जाहीर झाला. या पुरस्काराच्या घोषणेनंतर प्राजक्त देशमुखने आभार मानणारी पोस्ट शेअर केली आहे. आपल्या पोस्टमध्ये तो म्हणतो, ‘ कालपासून अनेकांचे फोन, मेसेज येत आहेत. या मोठ्या सन्मानाने गोंधळून जाऊन माझी तारांबळ उडाली आहे.

 

 

असं समजून जे फोन घेता आले नाहीत त्यासाठी तुम्ही मला माफ कराल अशी आशा आहे. दोन वर्षांनी नाटकवाल्यांच्या चेह-यावर हसू उमटलं. या निमित्ताने बंधितांनी पुन्हा नाट्यगृह सुरु करावीत ही विनंती.’ प्राजक्तच्या या पोस्टवर ऋतुजा बागवे, शिल्पा तुळसकर, ईशा केसकर, मयुरी देशमुख आणि ऐश्वर्या नारकर अभिनंदन करणा-या कमेंट केल्या आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive