भारतीय असंतोषचे जनक म्हणून लोकमान्य टिळकांकडे पाहिलं जातं. त्यांचाच बायोपिक म्हणजे ‘लोकमान्य एक युगपुरुष’ हा सिनेमा. अभिनेता सुबोध भावेने यात लोकमान्यांची भूमिका साकारली होती. टिळकांचा करारी बाणा, निस्पृहता व्यक्तिरेखेतून उभी करण्यात सुबोध यशस्वी झाला. ओम राऊत दिग्दर्शित या सिनेमाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
नॅशनल फिल्म अर्काईव्हच्या पोस्टरवर सुबोधच्या लोकमान्य सिनेमाचं पोस्टर दिसत आहे. सुबोधने याबाबत शेअर केलं आहे. आपल्या पोस्टमध्ये तो म्हणतो, ‘भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत माहोत्सवा निमित्ताने @nfaiofficial आणि @mib_india ने प्रकाशित केलेले हे एक खास पोस्टर! "लोकमान्य एक युगपुरुष" च्या निमित्ताने स्वातंत्र्य संग्रामातल्या एका अत्यंत महत्वाच्या व्यक्तीचा जीवनपट आम्ही मांडू शकलो.’