प्रसिद्ध नाटककार, पत्रकार आणि लेखक जयंत पवार यांचं निधन झालं आहे. ते 61 वर्षांचे होते. पवार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रात्री दोन वाजता हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. पण उपचारादरम्यान त्यानी अखेरचा श्वास घेतला. महाडमधील 15 व्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची धुरा जयंत पवार यांनी सांभाळली होती.
चौथी भिंत खचली..!
फार लवकर एक्झिट घेतलीस जयंत..
वेदनेनी जणू तुझा ध्यासच घेतला होता..
तुझ्या परिवाराला हे दु:ख पचवण्यासाठी बळ मिळो.. आता तर तू नाहीच येणार ना आमच्या प्रयोगांना #RIP #jayantpawar #writer#critic#theaterfriend pic.twitter.com/YphoKziRji— sonalikulkarni (@sonalikulkarni) August 29, 2021
त्यांना ’फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ या कथासंग्रहासाठी जयंत पवार यांना २०१२ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. अधांतर, काय डेंजर वारा सुटलाय, टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन (दीर्घांक), दरवेशी (एकांकिका), पाऊलखुणा (वंश या नाटकाचे व्यावसायिक रूप), फिनिक्सच्या राखेतून उठला मोर (कथासंग्रह), बहुजन संस्कृतिवाद आणि लेखक (भा़षाविषयक), माझे घर, वरनभातलोन्चा नि कोन नाय कोन्चा (कथासंग्रह), वंश, शेवटच्या बीभत्साचे गाणे (दीर्घांक), होड्या (एकांकिका) ही त्यांची ग्रथंसंपदा होती. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने पोस्ट शेअर करत जयंत यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेत्री नीलकांती पाटेकर यांनीही कविता शेअर करत जयंत यांना श्रद्धांजली वाहिली आहे.