By  
on  

शशांक केतकरने शेअर केलं ‘पाहिले न मी तुला’ मालिकेच्या निरोपाबाबत

शशांक केतकरने आतापर्यंत सालस, समंजस अशा व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. पण ‘पाहिले न मी तुला’ मालिकेत तो नकारात्मक भूमिकेत दिसला होता. या मालिकेतून शशांक पहिल्यांदाच खलनायक म्हणजेच नकारात्मक भूमिका साकारली. होती. या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. यावेळी समर साकारणा-या शशांकने खास नोट शेअर केली आहे.

 

 

आपल्या पोस्टमध्ये तो म्हणतो, ‘शेवटी समर सारख्या नराधमाच्या चेहऱ्याला चिखल फासलाच. पाहिले ना मी तुला ! आणखी एक अत्यंत वेगळं peoject  माझ्या वाट्याला आलं.  @kotharevision , @adinathkothare आणि @zeemarathiofficial सगळ्यांचे आभार project जरी लवकर संपलं असलं तरी या मालिकेमुळे झालेली मैत्री, अनेक आठवणी आणि खलनायकाची भूमिका करण्याचा अनुभव, सगळंच आयुष्यभरासाठी मिळालं.सर्व प्रेक्षकांचे आभार ज्यांनी मला या समारच्या रुपात सुध्धा स्वीकारलं किंवा नाकारलं. समरच्या वागण्यावरचा राग व्यक्त केला पण माझ्या भूमिकेचं...कामाचं कौतुकही केलं. पुन्हा एकदा धन्यवाद भेटूया लवकरच. शशांक आता ‘सोपं नसतं काही’ या वेबसिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive