By  
on  

सईची व्यक्तिरेखा मला मनापासून आवडली : गौतमी देशपांडे

नुकताच ‘माझा होशील ना’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेला प्रेक्षकांचं अमाप प्रेम मिळालं. या मालिकेती सई- आदित्यच्या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. सई साकारणा-या गौतमीने खास पोस्ट केली आहे.

 

 

आपल्या पोस्टमध्ये ती म्हणते, ‘खूप काही बोलायचं असतं आणि अचानक शब्द अपुरे पडतात तसं झालय अगदी माझं.... गेले अनेक दिवस ठरवत होते की काहितरी छान सुंदर लिहावं पण आता मात्र फक्त मन मोकळं करणारे मी....
मागचा वर्षी 6 फेब्रुवारी ला मला “माझा होशील ना”चा Audition कॉल आला होता....ऑडिशन-selection-मीटिंग-प्रोमो शूट - title सोंग शूट - फोटो शूट आणि finally सिरीयलच शूट हे 7 ते 12 फेब मध्ये वायुवेगानी घडलं..आणि मग एक अत्यंत सुंदर असा प्रवास चालू झाला... जेंव्हा आपल्याला एखादं character खूप मनापासून आवडतं तेंव्हा ते perform करण्याची मजाच काही और असते...मला सई मनापासून आवडली आणि म्हणुनच कदाचित तुमचाही मनात घर करून बसली...
सई नि मला आयुष्यभर पुरतील अशा आठवणी दिल्या आहेत ...
या प्रवासात कॉरोना नावाचा संकट येऊन गेलं तरीही त्या सगळ्यातून तावून सुलाखून आम्ही बाहेर पडलो तर ते तुम्हा प्रेक्षकां मुळे आणि आमचा प्रबळ इच्छाशक्ती मुळे....

या प्रवासात काही माणसांचा मनापासून उल्लेख करायचा आहे… सर्वात आधी , थँक्स झी मराठी @zeemarathiofficial , सोजल ताई , मृण्मयी , निलेश सर आणि सुबोध दादा ..मला ‘सई’ दिल्याबद्दल ! @sojalsawant @mrunmayeekuber @subodhkhanolkar , @sujayh_ आणि @onkar.kate ...तुम्हाला माहितीये ना तुम्ही जगातले भारी producers आहात.... थँक्स फॉर everything आणि thanks for being there always ....Lots of love and respect to you three️

अनिकेत @aniket_sane18 आणि @subodhkhanolkar दादा.... तुम्हाला अपेक्षित ‘सई’ मी साकारण्याचा प्रयत्न केला ..तरी काही राहून गेलं असेल तर sorry… तुमचा मुळे मला ‘सई’ कळली. थँक्स मला ‘सई’ शोधून दिल्याबद्दल ....
@khankarorama .... थँक्स ‘सई’ ला डॅशिंग समशेरसिंग आणि हळुवार रातराणी बनवणारे dialogues दिलेस तू...  ही पोस्ट संपताना सईने To be continued असं लिहिलं आहे. त्यामुळे पुढच्या पोस्टमध्ये सई आणखी आठवणी शेअर करेल यात शंका नाही.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive