लेखक-दिग्दर्शक केदार शिंदे हे आपल्या मालिका, सिनेमे आणि नाटकांसोबतच विविध सामाजिक विषयांवर करत असलेल्या विशेष टिप्पणीसाठी ओळखले जातात. करोना संकटामुळे यंदासुध्दा गोविंदांच्या उत्साहावर विरजण पडलं आहे.
काही काळासाठी सणवार, उत्सव बाजूला ठेवून जनतेचे प्राण वाचविण्याला महाराष्ट्राने प्राधान्य दिले, हा संदेश जगाला देऊया, असे आवाहन करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात यंदाही दहीहंडीला परवानगी दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर दहीहंडी उत्सव साजरा न करण्याचा निर्णय गोविंदा पथके,आयोजकांनी घेतला असला तरी काही राजकीय पक्ष, काही विरोधक यांनी सरकारचे नियम झुगारुन दहीहंडीउत्सव साजरा केला.
याच पार्श्वभूमीवर दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केलेली पोस्ट चर्चेत आहे.
राजकीय नेते एकमेकांच्या हंड्या फोडण्याचा कार्यक्रमात मग्न आहेत. त्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची त्यांची तयारी आहे. गेल्या दोन वर्षांत सामान्यांच्या जीवनाचा दहीकाला झालाय, याकडे कुणाचही लक्ष नाही.
— Kedar Shindde (@KedarShindde) August 30, 2021