काल श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला गेला. यावेळी अनेक कलाकारांनीही त्यांच्या खास अंदाजात सोशल मिडियावर या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण अभिनेते सचिन पिळगावकर यांना मात्र शुभेच्छा मुळे ट्रोल व्हावं लागलं.
सचिन यांनी सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या होत्या. या पोस्टमध्ये त्यांनी उर्दू शेर शेअर केला आहे. ‘जन्माष्टमी मुबारक हो… अगर किशन की तालीम आम हो जाए, तो काम फितनागरों का तमाम हो जाए’ हा मौलाना जफर अली खान यांचा शेर शेअर केला होता.
त्यांच्या या पोस्टवर नेटिझन्स नाराज झाले असून ट्रोल करायला मागे पुढे पाहिल नाही. ‘सर मराठी भाषा विसरले की काय… नाही मराठी बोलू शकत तर हिंदी भाषेचा वापर तरी करु नका’ अशा भाषेत नेटिझन्सनी त्यांच्या पोस्टचा समाचार घेतला आहे.