रिंकूच्या पप्पांनी केलं तिचं हे जबरदस्त फोटोशूट , तुम्ही पाहिलंत का?

By  
on  

सैराट सिनेमानंतर अभिनेत्री रिंकू राजगुरु सुसाट सुटली. सैराटची आर्ची ही ओळख कधीच मागे सोडत रिंकू सध्या अनेक मराठी सिनेमे, हिंदी वेबसिरीज यांमधून रसिकांच्या भेटीला येतेय. सैराटसाठी आपल्या पहिल्याच पदार्पणातील व्यक्तिरेखेसाठी रिंकूने राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. आता ती अनेक आव्हानात्मक भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येतेय. दरम्यान सोशल मिडीयावरुनही रिंकू चाहत्यांची मनं जिंकतेय. 

रिंकूनेतिचं एक सुंदर फोटोशूट शेअर केलं आहे, विशेष म्हणजे तिचं हे फोटो तिच्या पप्पांनी क्लिक केले आहेत. 

अभिनेत्री रिंकू राजगुरू इन्स्टाग्राम अकाऊंटवर विविध फोटो व व्हिडिओ पोस्ट करत चाहत्यांच्या सतत संपर्कात असते.

रिंकूची प्रमुख भूमिका असलेला 200 हल्ला हो हा दलित स्त्रियांवरील अत्याचारावर भाष्य करणारा सिनेमा अलिकडेच ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला आला. 

या सिनेमातील रिंकूने साकारलेली आशा सुर्वे सर्वांनाच भावली. तिच्या या भूमिकेचं खुप कौतुक झालं. 

 

Recommended

Loading...
Share