By  
on  

मराठी कार्यक्रमात दिसण्याबाबत असं होतं माधुरीच्या आईचं मत, वाचा सविस्तर

माधुरी दीक्षित अनेकदा तिचं मराठी भाषेवरील प्रेम जाहीररित्या व्यक्त करत असते. माधुरीने अनेक बॉलिवूड प्रोजेक्टसाठी काम केलं असलं तरी मराठी प्रोजेक्टबाबत अनेकदा प्रेम व्यक्त करत असते. आताही तिने खास किस्सा शेअर केला आहे. 

 

 

माधुरीने अलीकडेच एका मराठी कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. यादरम्यान तिने आई बाबतचा एक किस्सा शेअर केला.  माधुरीने नुकतीच प्लॅनेट मराठीच्या एका मराठी कार्यक्रमात हजेरी लावली होती. ती एका मराठी कार्यक्रमात हजेरी लावणार आहे याबाबत तिने आईशी शेअर केलं. ‘माझ्या आईला जेव्हा मी सांगितलं की मी एका मराठी कार्यक्रमामध्ये हजेरी लावणार आहे, तेव्हा ती खूप खुश झाली होती.’ माधुरी सध्या  डान्स दीवाने या शोची परिक्षक असून नेटफ्लिक्सच्या एका शोमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive