मुंबईतील गँगस्टर अरुण गवळी यांची मुलगी योगिता व मराठी अभिनेता अक्षय वाघमारे यांनी मागच्या वर्षी लग्नगाठ बांधली.
करोना काळात त्यांचा विवाहसोहळा अगदी साध्या पध्दतीने दगडी चाळीत संपन्न झाला.
यंदा अक्षय व योगिता यांच्या घरात ७ मे रोजी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं.
योगिता आणि अक्षय सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असतात.
सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्यांनी ही गुडन्यूज चाहत्यांना दिली.
अक्षय व योगिताने त्यांच्या मुलीचे नाव 'अर्णा' ठेवले आहे.
यात अर्णा आजी आजोबांसोबत पाहायला मिळतेय.
आता पहिल्यांदाच अक्षयने अर्णासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.