By  
on  

गायक, दिग्दर्शक अवधूत गुप्ते यावेळी घेऊन येतो आहे ‘कोकणचा गणपती

या महिन्यात अगदी काहीच दिवसांवर आलेल्या गणोशोत्सवाची वाट आपण प्रत्येकजण पाहात असतो. आताही हा उत्साहाची खाण असलेला सण अगदी काही दिवसांवर आला आहे. या निमित्ताने गायक दिग्दर्शक अवधूत गुप्तेने चाहत्यांसाठी खास भेट आणली आहे. अवधूत यावेळी चाहत्यांसाठी ‘कोकणचा गणपती’ नावाचा अल्बम घेऊन आला आहे.

 

 

यावेळी शेअर केलेल्या पोस्टमध्ये अवधूत म्हणतो, ‘गेली कित्येक वर्ष गणेशोत्सव म्हटलं, की दहा दिवसांत माझा अर्धा अधीक महाराष्ट्र पादाक्रांत व्हायचा! पुढे कधी कधी कोल्हापूर आधी आणि नंतर पुणे असंही व्हायचं. पण सुरुवात, म्हणजेच गणपती बसवायचा तो म्हणजे कोकणात वाडीला! मळगावातल्या आमच्या आजोळी.

मग, तिथून गोव्यातले नातेवाईकांचे गणपती करत करत कोल्हापूर. मग कोल्हापूरात पार पाटाकडल्या तालीम मंडळापासून सुरुवात करत शिवाजी चौकापर्यंत येईस्तोवर पन्नास एक गणपती होत असत आणि दोन दिवस जायचेच. मानाच्या फेट्यांनी गाडीची डिकी ओसंडून वहायची!! मग तसंच पुढे पुण्यात यायचं आणि सारसबागेपासून दगडूशेठ पर्यंत दंडवत घालत घालत, अनंत चतुर्दशीला मुंबईत श्रीकृष्ण नगरला विसर्जनाला पोहोचायचं! हा राबता तोडला तो म्हणजे ह्या नतद्रष्ट कोरोनाने!!

ह्यावर्षी सुद्धा जसजसे गणपती जवळ आले, तस-तशी ह्या #itinerary च्या आठवणीने मनाला प्रचंड हुरहुर लागली. आणि अशातच वैशालीने "सागरिका" मित्रमंडळात "कोकणचा गणपती.. वाडी गणपती" ही संकल्पना मांडली!! जणू काही माझ्या लाडक्या वाडीच्या बाप्पानेच मला साद घातली!! रघुनाथ मतकरींच्या उत्तम शब्दांना चिंतामणी ने अतिशय सुंदर असा स्वरसाज चढवला.

स्वप्निल च्या बरोबरीने एकाच दिवशी आजिवासन मध्ये सर्वांचे आवाज रेकॉर्ड करुन एक सोहळाच साजरा झाला. सागरिका मॅडमनी अलिबागच्या रम्य वातावरणात शुटिंग ठरवलं. म्हात्रेंचं हक्काचं "सन्मान" होतंच! डॉ. धामणकरांच्या बंगल्यात "क्षणात सरसर शिरवे- क्षणात ऊन" अशा श्रावणामध्ये शूटिंग करताना पार धांदल उडाली! असो तर.. यंदाच्या वर्षी बाप्पा चरणी आमचे हेच गंध पुष्प!! बाप्पा नक्की गोड मानून घेतील.. तुम्ही सुद्धा मानून घ्या.. हीच विनंती!! मोऽऽऽरया!!

Author

Recommended

PeepingMoon Exclusive