By  
on  

'अपने पास बहोत पैसा है' , म्हणणारी परी मालिकेच्या एका भागासाठी घेते इतकं मानधन !

'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका अल्पावधितच रसिकांच्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतेय. या मालिकेच्या निमित्ताने अनेक मातब्बर कलाकार एकत्र आले आहेत. यापैकीच नेहा कामतची म्हणजेच अभिनेत्री प्रार्थना बेहरेची गोंडस परी म्हणजेच बालकलाकार मायराच्या अभिनयाची खुप चर्चा रंगलीय. मालिकेतील तिचा निरागस अभिनय लहान-थोर सर्वांचीच मनं जिंकतोय. 

 

 

या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे मुख्य भूमिकेत आहेत. मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते.

श्रेयस आणि प्रार्थना या दोन उत्तम कलाकारांसोबतच मायरा ही चमुकली सुद्धा प्रेक्षकांना आपलीशी वाटत आहे.

या मालिकेसाठी प्रत्येक कलाकाराने आकारलेल्या मानधनाचा आकडाही मालिकेइतकाच खास आहे.

विशेष म्हणजे मानधनाच्या बाबतीत वयाने छोटी असणारी मायरा कमाईच्या बाबतीत इतर कलाकारांना तोडीस तोड आहे असं म्हणता येण्याइतकं तिचं मानधन आहे.

मायरा बालकलाकार असण्यासोबतच एक प्रसिध्द सोशल मिडीया स्टार आहे. तिचे असंख्य चाहते आणि जबरदस्त फॅनफॉलोव्हिंग आहे. 

मायरा फक्त चार वर्षांची आहे.

आता मायराच्या मानधनासंदर्भात बोलायचं झाल्यास अवघ्या चार वर्षांची ही चिमुकली एका भागासाठी तब्बल १० हजार रुपये मानधन घेते.

 

  1.  

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive