ऑनलाईन लग्नाची काहीशी हटके संकल्पना असलेल्या ‘शुभमंगल ऑनलाईन’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. शंतनू आणि शर्वरीच्या हटके लग्नसोहळा, ऐश्वर्याचं कारस्थान, शर्वरी आणि शंतनूचं बाँडिंग यांनी नात्याला चार चांद लावले. पण ही मालिका आता लवकरच निरोप घेणार आहे. यामुळे शंतनूच्य भूमिकेत असलेला सुयश टिळकने खास पोस्ट शेअर करत या व्यक्तिरेखेचे आभार मानले आहेत.
सुयश आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, ‘आज हा प्रवास संपला. नवीन प्रवास सुरू होण्या आधी हे लिहावसं वाटलं (नाही नवीन प्रवास म्हणजे बिग बॅास च्या घरात मी नाहीये तर कृपया तश्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका)
“शंतनू सदावर्ते.” आजपर्यंत केलेल्या पात्रांपैकी वेगळं, हळवं,गडबडलेलं, पण सावरू पहाणारं पात्र. आजच्या पिढीतला तरूण मुलगा आणि त्याची गोष्ट. मालिकेची सुरूवात वेगळ्या नोट वर झाली खरी, पण पुढे त्यात वेगवेगळी वळणे येत गेली त्या प्रमाणे शंतनुला समजून घेणं कधी सोप्पं तर कधी अवघड होत गेलं.
माझ्या मुळ स्वभावाच्या अगदी विरूद्ध जाणारा शंतनू मला सापडेल का नाही ह्याची मनात खूप भिती होती. पण शंतनू बरोबर मला मज्जा आली. मी रोज वेगळ्या mindset नी शंतनू ला समजून घेत होतो.ह्या सगळ्या प्रवासात नवीन कुटुंब जमलं.
सुबोध दादा मंजिरी ताई कडून प्रेमाची कौतुकाची आपुलकिची थाप वेळोवेळी आत्मविश्वास वाढवत गेली. मनिष दादा, वैभव सर, मंजिरी ताई ह्यांनी दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरण्याची मजबूत कसोटी लागली होती. दररोज वेगळं आव्हान समोर होतं.
दिपा ताई तुला पण मनापासून धन्यवाद मला शंतनु म्हणून पाहीलस त्यासाठी. निशांत सुर्वे, मिलिंद पेडणेकर, रोशन, निमिष, सिद्धी, सुशांत,सुरभी तुमच्याशिवाय तर काहीच शक्य नव्हतं. सचिन पटेकर सर, कुंजन ह्यांची कॅमेरा आणि लाईटिंग ची रिअलिस्टीक पद्धत.
महेश कुडाळकर तुझा कमाल सेट जिथे सगळे लोकेशन्स तयार केलेस. चेतन चे कमाल संवाद. जितू भाईं, जीत तुमचा कथाविस्तार; सनी, मयुर प्रथमेश तुमच्या सारखे make up करणारे मित्र. उदय ,प्रणाली,गौतम,अभिषेक costumes team सचिन दादा, संतोष दादा, शेख भाई,श्रवण दादा तुम्ही आमची रोज घेत असलेली काळजी. लाईट ची आर्ट डिरेक्शन ची सगळी टिम कलर्स मराठी ची टिम हे सगळं मी रोज मिस करेन.