By  
on  

प्रेक्षकांच्या ट्रोलिंगला कंटाळून या अभिनेत्याने केलं भावनिक अपील

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेत स्वीटूचं लग्न ओमसोबत न होता मोहितसोबत  झाल्याने प्रेक्षकांचा मात्र चांगलाच विरस झाला आहे.  मोहित स्वीटूच्या घरच्यांना त्रास देण्याची एकही संधी सोडत नाही. मोहित हा पैश्यासाठी वाट्टेल ते करायला तयार  असल्याने मालविका या संधीचा फायदा घेताना दिसत असते. आता मोहित आणि स्वीटू ओमच्याच घरी राहायला गेल्याचं समोर येत आहे. 

 

 

 आतापर्यंत सतत कारस्थान करत असल्याने मोहितची भूमिका साकारणा-या निखिल राऊतला मात्र प्रेक्षकांनी चांगलंच धारेवर धरलं आहे. निखिलला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं गेलं. यावर निखिल म्हणतो,  ‘निगेटिव्ह भूमिका साकारणं म्हणजे ट्रोल होणं हे ओघाने आलंच. मी एक अभिनेता आहे आणि मला जे काम दिलं आहे ते मी करतो आहे. पण वैयक्तिक पातळीवर ट्रोलिंग करणं चुकीचं आहे. व्यक्तिरेखेचा आणि पर्सनल आयुष्याचा काही संबंध नाही. त्यामुळे प्लीज थांबवा.’

 

 

 

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive