By  
on  

पाहा Video : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने भावासोबत साकारला इको-फ्रेंडली बाप्पा

आपण सर्वचजण  वर्षभर चातकासारखी गणपती बाप्पाची वाट पहात असतो. आज गणेशचतुर्थी.  सर्वत्र गणरायाच्या आगमनाने आनंद आणि भक्तीमय वातावरण आहे. दरवर्षी प्रमाणे महाराष्ट्राची अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णीकडे देखील गणपत्ती बाप्पा विराजमान होणार आहेत. यंदा देखील सोनाली कुलकर्णीने आणि तिच्या भावाने अतुल कुलकर्णीने एकत्र येत गणरायाची मूर्ती घरीच साकारली आहे. गेल्या तीन वर्षांपासून सोनाली तिच्या भावासोबत घरच्या घरीच बाप्पाची मूर्ती साकारत आहे. सोनालीचा भाऊ इको-फ्रेंडली बाप्पाची मूर्ती साकारतो तर सोनाली या मूर्तीची छान रंगरंगोटी करते.

हा व्हिडीओ शेअर करत सोनाली कॅप्शनमध्ये तिने लिहते, “वर्षतली ही सर्वात सुंदर वेळ आहे. ३ वर्षांपूर्वी सुरू केलेला हा प्रयत्न यंदा ही असाच पुढे नेत आहोत…माझा भाऊ अतुल कुलकर्णी शाडू मातीची मुर्ती बनवतो आणि मी हळ्दी-कुंकुवाच्या पाण्यानी रंगवते…तयारी बाप्पा च्या आगमनाची” असं म्हणत

घरच्या घरी बाप्पा साकारण्याचं सोनालीचं हे चौथं वर्ष आहे.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive