By  
on  

अभिनेत्री अमृता खानविलकरने बाप्पासमोर केली नृत्यवंदना, पाहा व्हिडियो

आज घरोघरी उत्साहात बाप्पांचं आगमन झालं आहे. अगदी सगळा माहोल बाप्पामय झाला आहे. प्रत्येकजण आपल्या परीने बाप्पाच्या सरबराईत रमला आहे. अभिनेत्री, नृत्यांगना अमृता खानविलकरने मात्र हटके पद्धतीने बाप्पाचं स्वागत केलं आहे. अमृताने तिच्या अमृतकला या नृत्य सिरीजमधून बाप्पाला नृत्यवंदना दिली आहे.

 

 

 केशरी लेहंगा घातलेल्या अमृताने बाप्पाच्या आरतीवर सुरेख नृत्य सादर केलं आहे. अमृता आजवर अमृतकला या सिरीजच्या माध्यमातून अनेक सुरेख नृत्याविष्कार चाहत्यांसाठी घेऊन आली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive