ज्या दिवसाची सगळेच आतुरतेने वाट पाहात असतात तो दिवस आला आहे. आपल्या घरी बाप्पाचं आगमन व्हावं. यासाठी अनेक दिवस तयारी सुरु असते. अभिनेता श्रेयस तळपदेच्या घरीही बाप्पाचं आगमन झालं आहे. पण श्रेयसच्या घरी यावर्षी बाप्पाचं आगमन खास आहे. कारण श्रेयसच्या घरी जवळपास सात वर्षांनी बाप्पाचं आगमन झालं आहे.
श्रेयस आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, ‘बाप्पा जवळपास सात वर्षांनी घरी आले आहेत. पण या सगळ्याचं श्रेय माझ्या पत्नीला जातं. तिने बाप्पाच्या आगमानाची खुप तयारी केली आहे. इतक्या वर्षा मागच्या गॅपची स्टोरी मात्र पुन्हा कधीतरी सांगेन. सगळ्यांना गणोशोत्सवाच्या शुभेच्छा.’ श्रेयस सध्या तुझी माझी रेशीमगाठ या मालिकेत यशवर्धनच्या व्यक्तिरेखेत दिसतो आहे.