By  
on  

रितेश आणि जिनेलियाचं मुलांचं होतंय सर्वत्र कौतुक, पाहा Video

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा झेंडा दिमाखात फडकवणारा  मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख सोेशल मिडीयावर सतत सक्रीय असतो. दरवर्षी रितेशकडे बाप्पाचं आगमन होतं.  त्याप्रमाणे यंदाच्या वर्षीही रितेशने गणपती बाप्पाचे स्वागत केले आहे. रितेशने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत रितेशचे दोन्ही मुलं रियान आणि राहिल दिसत आहेत.

हे दोघं गणपती बाप्पाची आरतीअगदी स्पष्ट आणि योग्य म्हणत आहेत. या व्हिडीओत दोघेही खूप क्यूट दिसत आहेत. रियान आणि राहिल दोघांनीही एकसारखे कपडे परिधान केले आहेत. त्यांनी पांढऱ्या रंगाचा कुर्ता-पजामा आणि त्यावर गुलाबी रंगाचं जॅकेट परिधान केलं आहे. हा व्हिडीओ शेअर करत ‘गणपती बाप्पा मोरया’ असे कॅप्शन रितेशने दिले आहे.

 

नेटकऱ्यांनी रितेशच्या या व्हिडीओवर कमेंट करत त्याची आणि जिनेलियाचे कौतुक केले आहे.

रितेशने हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर काही वेळातच हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ ३ लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. रियान आणि राहिलच्या या हा व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive