By  
on  

पाहा 'माझी तुझी रेशीमगाठ'ची परी फेम बालकलाकार मायराचा बाप्पा

एक -दोन-तीन चार गणरायाचा जयजयकार, या नाद घोषांनी आज अवघा आसमंत दुमदुमला आहे. अवघ्या  महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणपती बाप्पाचे आज आगमन..."गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया" अशा जयघोषात सर्वत्र गणपती बाप्पा विराजमान होताना दिसत आहे. बाप्पाच्या आगमनाचा सर्वत्र आनंद आणि हर्षोल्हास औसंडून वाहतोय. भक्तांच्या हाकेला ओ देत गणराय आजपासून दहा दिवसांच्या मुक्कासाठी आले आहेत.

मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांच्या घरी बाप्पा मोठ्या दिमाखात विराजमान झाले आहे. 

 'माझी तुझी रेशीमगाठ'मालिकेतील छोट्या परीने अल्पावधीतच रसिकप्रेक्षकांच्या मनात स्थान पटकावलं आहे.

आपल्या गोड अभिनयाने परी साकारणारी बालकलाकार मायरा वायकुळ हिने सर्वांनाच वेड लावलं आहे. 

मायराच्या घरच्या बाप्पासोबतचे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आले आहेत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive