By  
on  

अभिनेता अंकीत मोहन आणि पत्नी रुचीने दिली गुड न्यूज!

मराठी सिनेमांमध्ये झळकणारा पिळदार शरीरयष्टीचा दमदार अभिनेता अंकित मोहन आणि त्याची पत्नी रुची यांनी चाहत्यांना नुकतीच एक गोड बातमी दिली आहे. दोघंही लवकरच आई-बाबा होणार आहेत. 

बाप्पाच्या स्वागतासोबतच एक नवी सुरुवात असं छान कॅप्शन देत अंकितने चाहत्यासह ही गुड न्यूज शेअर केली आहे. चाहते आणि सोलिब्रिटी वर्तुळातून या गोड कपलवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ankit Mohan (@ankittmohan)

 

अंकितने पिवळ्या रंगाचा कुर्ता तर रुचीने पिवळ्या रंगाची साडी आणि हिरवा ब्लाऊज अशा खास पोशाखात फोटोशूट केलं आहे. 

 

सोशल मिडीयावर आपल्या फोटोशूटमधून अंकित आणि रुची नेहमीच कपल गोल्स देतात. 

फर्जंद, मन फकिरा यांसारख्या मराठी सिनेमांमधून रसिक प्रेक्षकांची मनं जिंकणारा अंकित लवकरच पावनखिंड या ऐतिहासिक सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तसंच अभिनेत्री नेहा महाजनसोबत त्याच्या एका क्राईम-थ्रीलर वेबसिरीजचं शूट नुकतंच पूर्ण झालं आहे. तर अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडसोबत त्याची डबल गेम ही वेबसिरीजही येतेय. तसंच हवाहवाई या मराठी सिनेमातसुध्दा अंकित झळकतोय. 

Recommended

PeepingMoon Exclusive