Video : मानसी म्हणते, 'सोन्यामोत्यांच्या पावली आली अंगणी गौराई....'

By  
on  

गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. लाडक्या बाप्पाचं घरोघरी आगमन झालं आहे. आत्ता बाप्पांपाठोपाठ गौराईसुध्दा पाहुणचारासाठी माहेरी आलेल्या आहेत. मनोरंजनविश्वातील अनेक सेलिब्रिटींकडे बाप्पाचा अनोखा थाट पाहायला मिळतोय पण त्यासोबतच गौरीचा उत्साहसुध्दा तितकाच दांडगा आहे. नवविहित मराठी अभिनेत्री मानसी नाईकसाठी यंदाचं गौरीपूजन खास आहे. म्हणूनच तिने पूजा-अर्चा आणि गाणी गात, नाचत गौरीचं स्वागत केलं आहे. 

मराठमोळ्या पारंपारिक साजात सजलेल्या मानसीने गौरींच्या स्वागतासाठी –पूजेसाठी केलेला हा खास व्हिडीओ नुकताच तिच्या सोशल मिडीया अकाऊंटवरुन शेअर केला आहे. दीड दिवसांची माहेरवाशीण गौरीचा साज-श्रृंगार डोळे दिपवून टाकणार असतो. 
 

Recommended

Loading...
Share