आपल्या बिनधास्त आणि बेधडक वक्तव्यामुळे चर्चेत असणारी मराठी अभिनेत्री हेमांगी कवी पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या बलात्काराच्या घटनेने अवघा महाराष्ट्र हादरुन गेला आहे. याच प्रकरणी हेमांगीची ही पोस्ट चर्चेत आहे. . हेमांगीने फेसबूकवर ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये हेमांगीने संताप व्यक्त केला आहे.
हेमांगीने फेसबूकवर ही पोस्ट शेअर केली आहे. आरोपी कोणीही असला तरी जाब मात्र महिलेलाच विचारला जातो यावर तिने पोस्ट लिहली आहे. “आणखी एक! तिचीच चूक असणार! तिचे कपडे चुकले असतील! एवढ्या रात्री ती काय करत होती? एकटी होती की कुणासोबत होती? तिची जात काय, धर्म काय, कुठे काम करत होती? किती कमवत होती? लग्न झालेली होती, अविवाहित होती, घटस्फोटीत होती, मुलं बाळं किती? ती मुंबईची की आणखी कुठली! सगळं सगळं तीचंच चुकलं असणार!चला आता आपण तिलाच आणखीन घाबरऊन ठेऊया! बाकी त्याला कसलंच बंधन नको, सगळी सूट देऊया! काय?” अशी पोस्ट लिहित हेमांगीने संताप व्यक्त केला आहे. तिने अतिशय गंभीर गोष्टीवर भाष्य केलं आहे.
मुंबईतील साकीनाका येथे महिलेवर बलात्कार करण्यात आला आणि यावेळी आरोपीने गुप्तांगात रॉड घुसवल्याचा अमानवीय प्रकार समोर आला. महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. पण तिचा २ दिवसापूर्वी उपचारांदरम्यान मृत्यू झाला.