‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेची लाडकी जोडी म्हणजे शिवा आणि सिद्धी. अशोक फळदेसाई आणि विदुला चौगुले यांनी या व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. या जोडीवर चाहत्यांचं मनापासून प्रेम आहे. ही जोडी गणपती बाप्पाच्या एका व्हिडीओसाठी एकत्र आली होती. पण या गाण्याच्या शुटिंग दरम्यानच पहिल्या दिवशीच विदुलाचा अपघात झाला.
पाय मुरगाळून पडल्याने तिला दुखापत झाली. पण प्रथमोपचार घेऊन वेदना सहन करत तिने नेटाने शुटिंग पुर्ण केलं. हा व्हिडियो तिने शेअर केला आहे. या गाण्याला 1 मिलियन व्ह्युज मिळाल्याने हे दुखणं वर्थ असल्याचं ती म्हणते आहे. तिच्या या व्हिडियोवर विदुलाला चाहते ही काळजी घे अशी कमेंट करताना दिसत आहेत.