अभिनेत्रीसायली संजीवच्या घरी दरवर्षी गौरीं गणपतीचे आगमन होते. तसंच यावर्षी देखील माहेरवाशिणीचे आगमन झाले आहे. दिड दिवस माहेरवाशिणींची यथासांग पूजा-अर्चा आणि नैवेद्य असा थाट झाल्यानंतर त्यांचं आज विसर्जन होणार आहे. सायलीने आपल्या गौराईंसोबतचे खास फोटो नुकतेच सोशल मिडीया अकाऊंटवरुन चाहत्यांशी शेअर केले आहेत.
पिपींगमूनला दिलेल्या एक्सक्ल्युझिव्ह मुलाखतीतत सायली सांगते, "माझ्यासाठी हा सण खुपच खास आहे. याला कारण आहे आमच्या घरच्या गौरी. आमच्या घरच्या गौरीला जवळपास 150 किंबहुना त्याहीपेक्षा जास्तच वर्षांची परंपरा आहे. त्यामुळे या गौरींचे मुखवटेही तितकेच जुने आहेत. विशेष म्हणजे हे मुखवटे शाडूच्या मातीचे आहेत. अनेकदा त्यावर मी रंगकामही केलं आहे. या गौरीची मांडणी करतानाही तितकंच कौशल्याने करावी लागते. त्याच्या विशिष्ट साच्यात साडी नेसवणे, योग्य नि-या करणे हे सगळं झाल्यावर त्या साच्याला कापडी हात जोडले जातात. या गौंरींचे दागिने खुप वैशिष्ट्य पुर्ण आहेत. पुर्वीच्या काळी असलेल्या पितळी नाण्यांपासून या गौरींचे दागिने बनवले आहेत. त्यामुळे गौरींइतकेच त्यांचे दागिनेही जुने आहेत."