By  
on  

अमृता सुभाष आणि ज्योती सुभाष या मायलेकींनी सादर केलं हे सुरेख लोकगीत, पाहा व्हिडियो

सध्या सगळीकडे गौरी गणपतीचा माहोल आहे. करोनामुळे मागील वर्षी सुन्या गेलेल्या या सणाचा रंग हळूहळू का होईना खुलतो आहे. अनेक सेलिब्रिटीनींही त्यांच्या बाप्पाचे फोटो व्हिडियो शेअर केले आहेत. अभिनेत्री अमृता सुभाषनेही खास व्हिडियो शेअर केला आहे. यात ती आई ज्योती सुभाषसोबत लोकगीत म्हणताना दिसते आहे. 

 

 

यावेळी दिलेल्या कॅप्शनमध्ये अमृता म्हणते, ‘हे लोकगीत चंद्रकांत काळे माधुरी पुरंदरे आणि प्राची दुबळे यांच्या शेवंतीचं बन या कार्यक्रमातलं,मी आणि आईनं गौरीपूजनाच्या निमित्तानं गायलं .. ही साडी मी सुमित्रा भावेंच्या दिठी चित्रपटात नेसले होते. ती गेल्यावर तिची आठवण म्हणून मला दिली. सुमित्रा मावशी कायम माझ्याबरोबर आहेतिला हे गाणं आवडलं असतं.’

Recommended

PeepingMoon Exclusive