गणपती बाप्पा घरी येऊन पाच दिवस झाले असले तरी त्यांच्या पाहुणचाराचा उत्साह ओसरताना दिसत नाही. घरातील प्रत्येकजण बाप्पाच्या सरबराईमध्ये मनापासून गुंतलेला दिसतो. अभिनेत्री तेजस्विनी पंडितनेही बाप्पासाठी खास मोदक बनवले आहेत. तेजस्विनीने मोदकांसोबत खास फोटो शेअर केला आहे.
तेजस्विनीच्या कॅप्शनने मात्र लक्ष वेधलं आहे. ती आपल्या पोस्टमध्ये म्हणते, ‘FAILURE....? Or TRY AGAIN & FAIL BETTER ? यावर्षी ही हात वळणीचे मोदक नाही जमले....try केले तरीही अनेक तुटले. मग वाटलं अन्न नासाडी नको म्हणून पुन्हा साच्यातून बनवले. पुढच्या वर्षी पुन्हा प्रयत्न करेनच... !
शेवटी काय, बाप्पा साठी स्वच्छ भावनेने मोदक करणं महत्त्वाचं, बाकी साच्यातून असो वा हात वळणीचे...जाणारेत बाप्पा च्या आणि नंतर आपल्याच पोटात ता.क. अत्यंत हट्टी मुलगी आहे मी..हात वळणीचे मोदक करून तर राहणारच..